महापालिकेतच सायकल “उपरी’

मुख्य इमारत आवारात पार्किंगसाठी जागाच नाही


दिखाव्यासाठी उभा केलेला फलकही मोडून पडला

पुणे – शहरातील नागरिकांसाठी कोट्यवधी रुपयांची सायकल योजना राबविणाऱ्या सायकल विभागाकडे पालिकेच्या मुख्य इमारतीत सायकल पार्किंगसाठी जागाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेत सायकल्स घेऊन येणाऱ्या नागरिकांना सायकल्स रस्त्यावर उभ्या करण्याची वेळ आली आहे.

महापालिका प्रशासन शहरात “पब्लिक बायसिकल शेअरिंग’ योजना राबवित आहे. त्या अंतर्गत पुढील काही वर्षांत पुणेकरांसाठी सुमारे एक लाख सायकल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही सायकल योजना “डॉकलेस’ स्वरूपाची असल्याने ती वापरल्यानंतर नागरिकांना शहरात कोठेही उभी करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेने सायकल पार्किंगसाठी सुमारे 1 हजार जागा उपलब्ध करून देण्याचे ठरविले असून प्रशासनाने त्यासाठी जागांवर फलक लावणे, पट्टे आखणे ही कामे सुरू केली आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. असे असतानाच, दुसऱ्या बाजूला महापालिका मुख्य इमारतीमध्येच सायकल पार्किंगसाठी जागा नसल्याचे समोर आले होते. प्रशासनाने या योजनेच्या प्रसारासाठी काही दिवस पालिका भवन आवारात सायकल्स आणून ठेवल्या होत्या. त्यासाठी जागाही दिली. तर, महापालिकेत सायकली आहेत हे दाखविण्यासाठी सायकलच्या पार्किंगचा फलकही तयार करण्यात आला. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांत हा फलकही मोडून पडला आहे. तर, सायकल घेऊन आलेल्या नागरिकांना सायकलसह इमारत आवारात सोडलेच जात नाही. त्यामुळे या सायकल्स रस्त्यावर उभ्या करूनच महापालिकेत प्रवेश करावा लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1 हजार पार्किंग नावालाच
सायकल योजनेसाठी महापालिकेकडून शहरात जवळपास 1 हजार पार्किंगची ठिकाणे निश्‍चित करून त्या ठिकाणी फलकही लावण्यात आलेले आहेत. मात्र, त्यातील काही मोजल्यच ठिकाणी सायकलींना हक्काची जागा मिळालेली आहे. तर इतर ठिकाणी दुचाकी, चारचाकी तर काही ठिकाणी रिक्षांनी आपला ठिय्या मांडला आहे. त्यामुळे शहरातही सायकली लावण्यासाठी जागा नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांकडून सायकली पदपथावरच लावण्यात आल्या असल्याचे चित्र आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)