महापालिकेच्या 7 विद्यालयांमध्ये व्हेंडिग मशिन

पिंपरी – राज्यातील ग्रामीण भागातील महिला व शाळेतील 11 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान “सॅनिटरी नॅपकीन’ व वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यासाठी “अस्मिता’ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शहरातील मुलींनीही याबाबत सजग व्हावे या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 18 पैकी 7 शाळांमध्ये “व्हेंडिग मशिन’ बसविण्यात आले आहे.

महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या नऊ शाळांमध्ये मशिन बसविण्यात आले होते. मात्र, आकुर्डी येथील शाळेतील मशिन नादुरुस्त झाले असून यशवंतनगर येथील क्रीडा प्रबोधिनी शाळेत वीज जोडणी नसल्याने मशिन बसविता आले नाही. उर्वरित पाच शाळांमध्ये मशिन बसविण्याचे काम सुरू आहे. तर उरलेल्या तीन शाळांसाठी मशिन येणे बाकी आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य कुटुंबातील मुली शिक्षण घेतात. बहुतांशवेळा अशा कुटुंबातील मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान घ्यावयाच्या काळजीचा अभाव दिसून येतो. तसेच, त्यांच्यामध्ये मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज असल्याने मुलींमध्ये आरोग्याच्या तक्रारी आढळतात. या मुलींना मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकीन वापरण्याची सवय लागावी व त्यांच्यातील गैरसमज दूर व्हावेत यासाठी “व्हेंडिंग मशिन’ची योजना लाभदायक ठरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“व्हेंडिंग मशिन’ची देखभाल व दुरुस्तीकडे शाळा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून मुलींना त्याचा फायदा होईल. ज्या शाळांमध्ये मशिन बसविणे बाकी आहे अशा शाळेतील मुख्याध्यापकांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. तसेच, स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निसंकोचपणे मशिनचा वापर करावा. मुलींनी आरोग्याच्या दृष्टीने “सॅनिटरी नॅपकीन’चा वापर केला पाहिजे, असे मत पालकांनी व्यक्त केले आहे. विद्यार्थीनी व महिलांना “सॅनिटरी नॅपकीन’ वापरण्यासाठी अक्षय कुमारच्या “पॅडमॅन’ चित्रपटातून जनजागृती करण्यात आली होती. त्यामध्ये, सॅनिटरी नॅपकीन वापरण्याचे फायदे व आरोग्याचा दृष्टीने कसे महत्त्वाचे आहे हे विद्यार्थीनी व महिलांना समजावून सांगण्याची गरज आहे. याबाबत, महिला व विद्यार्थीनींचे गैरसमज दूर करणे व आरोग्यासाठी सॅनिटरी पॅड वापरणे गरजेचे आहे, या विषयी विविध माध्यमातून जनजागृती होण्याची आवश्‍यकता आहे.

माध्यमिक विभागाच्या सात शाळांमध्ये मशिन बसवून सुरू केलेल्या आहेत. उर्वरित शाळांमध्ये लवकरच मशिन बसविण्यात येणार आहेत. तसेच, विद्यार्थीनींनी व्हेंडींग मशिनचा वापर करुन आरोग्याची काळजी घ्यावी.
– पराग मुंढे, सहाय्यक प्रशासन अधिकारी, माध्यमिक विभाग, महापालिका.

विद्यार्थीनींमध्ये मासिक पाळीबाबत घ्यावयाच्या काळजीचा अभाव दिसून येत आहे. याबाबत जनजागृती करण्याची आवश्‍यकता आहे. शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध होत असल्यामुळे मुलींनी त्याचा वापर करण्याची गरज आहे. तसेच, शाळेतील अनेक मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
– सोनाली गव्हाणे, सभापती, शिक्षण समिती महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)