महापालिकेच्या 123 शाळांमध्ये “ई-लर्निंग’

पिंपरी – “स्मार्ट सिटी’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 123 शाळांमध्ये “ई-लर्निंग’ प्रणाली सुविधा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी एकूण 43 कोटी रूपये खर्च आहे.

स्मार्ट सिटीच्या प्रकल्प समन्वय समितीची बैठक महापालिकेत झाली. यामध्ये याबाबत सादरीकरण करण्यात आले. या वेळी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक प्रमोद कुंटे हे स्मार्ट सिटीचे संचालक, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण, सह शहर अभियंता राजन पाटील, अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

स्मार्ट सिटी अंतर्गत 12 शाळांमध्ये ई-लर्निंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाप्रमाणे स्मार्ट पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. पूर्वी ही संख्या 6 होती. त्यात जाधववाडी, चिखलीतील साई जीवन विद्यामंदिर, निगडी, सेक्‍टर क्रमांक 22 येथील मधुकरराव पवळे शाळा, लांडेवाडी, भोसरीतील सावित्रीबाई फुले शाळा, पिंपरीतील नवनाथ साबळे शाळा, तळवडेतील अंतुजी भालेकर शाळा आणि चिखली शाळा क्रमांक 90 व 91 या 6 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. सहा महिन्यात 123 पैकी उर्वरित शाळांमध्ये ही सुविधा दिली जाईल. यासाठी 43 कोटी रूपये खर्चाची निविदा आहे. त्यासंदर्भात सविस्तर सादरीकरण संचालकांसमोर करण्यात आले.

वीज निर्मितीचा प्रस्ताव लांबणीवर
पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर येथे पब्लिक बायसिकल शेअरिंग उपक्रम सुरू आहे. येत्या 15 जानेवारीपासून आणखी 700 सायकली उर्वरित भागात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. “स्मार्ट सिटी’ अंतर्गत वायसीएम रूग्णालय व सेक्‍टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात सौर उर्जा प्रकल्पातून वीज निर्मितीबाबत संबंधित कंपनीशी करार करण्याचा प्रस्ताव तांत्रिक कारणामुळे प्रलंबित ठेवण्यात आला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)