महापालिकेच्या शिष्यवृत्तीला मुदतवाढ

अर्जास विलंब झालेल्या विद्यार्थ्यांना लाभ : महिन्यानंतर अचानक निर्णय 

पुणे – महापालिकेकडून शहरातील दहावी आणि बारावीच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक अर्थसाह्य योजनेस अचानक मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 24 ते 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुलांना ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहिती समाज विकास विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास विलंब झालेल्यांना याचा लाभ मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इयत्ता 10 वी आणि 12 वीमध्ये खुल्या गटांतील मुलांना असलेल्या दहावीसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजना यांतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. दहावीसाठी 15 हजार, तर 12 वीसाठी 25 हजार रुपये दिले जातात.

यावर्षी ऑनलाईन पद्धतीने 25 जुलै ते 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, तोपर्यंतही दहावी, बारावीचे प्रवेश झालेले नसल्याने ही मुदत 29 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. या मुदतीत 13 हजार अर्ज पालिकेस प्राप्त झाले असून त्याची तपासणी सुरू आहे. तसेच या महिन्याच्या अखेरीस ही शिष्यवृत्ती मुलांच्या बॅंक खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहेत. मात्र, आता अचानक महिन्याभरानंतर मुदतवाढ दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

या संकेतस्थळावर करता येईल अर्ज
dbtpuencorporation.org या संकेतस्थळावर मुलांनी अर्ज भरून द्यावेत. त्यानंतर या अर्जाची प्रत मुलांनी अथवा पालकांनी आपल्या प्रभागासाठी असलेल्या क्षेत्रीय कार्यालयात जमा करायची असून त्यासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आल्याचे समाज विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)