महापालिकेच्या शिष्यवृत्तीस मुदतवाढ?

1 ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार

पुणे : महापालिकेकडून इयत्ता दहावीसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत 15 हजार रुपये तर इयत्ता बारावीसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी मागविण्यात आलेल्या अर्जांची मुदत बुधवारी रात्री (12 स्प्टेंबर) रोजी संपत असल्याने महापालिकेकडून ऑनलाईन अर्ज भरण्यास 1 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली. अद्यापही अकरावीचे विज्ञान, विधी तसेच अभियंता शाखेची प्रवेश प्रक्रीया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पालक आणि लोक प्रतिनिधींकडून अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती.

महापालिकेकडून या शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज 25 जुलैपासून सुरू असून 12 सप्टेंबरपर्यंत पालकांना दाखल करता येणार होते. ही मुदत मध्यरात्री संपणार होती. त्यामुळे प्रशासनाने बुधवारी तातडीने मुदतवाढीचा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला होता. तसेच, पालिकेच्या संगणक विभागाकडूनही त्यानुसार, ऑनलाईन यंत्रणेत बदल करण्याचे काम हाती घेतले होते. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी आता 1 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, ऑनलाईन शिष्यवृत्तीस मुदतवाढ देण्याची मागणी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे तसेच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पत्राद्वारे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली होती.

ऑफलाईनचा तिढा कायम
महापालिका प्रशासनाकडून ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असली तरी, अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत असल्याने पालकांकडून ऑनलाईन अर्ज संपल्यानंतर ऑफलाईन स्विकारण्यास सुरुवात करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्याप त्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे महापालिकेने ऑनलाईन अर्जांना परवानगी दिली तरी ऑफलाईन स्विकारणार का, नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम असून अनेक पालकांनी ऑफलाईन अर्ज घेण्याची विनंतीही पालिकेकडे पत्राद्वारे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)