महापालिकेच्या शिक्षण विभागाचे पुरस्कार जाहीर

पुणे – दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिका हद्दीतील मनपा, खाजगी अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी 19 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.

गतवर्षीपासून राज्य शासनाच्या धर्तीवरच पुरस्कार निवडीचे निकष निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यासाठी मर्यादित पुरस्कार निवड समिती स्थापन करून ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. तसेच पुरस्कारांची संख्या मर्यादित ठेवण्याचे ठरल्यामुळे महापालिका प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी 10 पुरस्कार, महापालिकेच्याच माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी-2, खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी-3 आणि खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी-5 पुरस्कार असे एकूण 20 पुरस्कार देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि टॅब असे प्रस्तावित पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी 89 शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. प्रत्यक्ष मुलाखत आणि पडताळणीसाठी 39 पात्र शिक्षक उपस्थित होते. त्यातून 19 जणांची निवड करण्यात आली.

हिरामण सगभोर, राखी रासकर, शांता सातव, नितीन वाणी, जयश्री रुकडीकर, संगीता देशमुख, वर्षा काळे, दीपाली आल्हाट, भारत आगळे, अरुणा खेडकर, मायावती पाटील, स्वाती धुमळ, वैशाली वाढवणे, मनिषा हवालदार, शोभा पाटील, संजय भूकण, विमल परदेशी, जयश्री बुलबुले, अरब रिझवान अशी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)