महापालिकेच्या शिक्षक दिनाला मुहूर्त?

पिंपरी – महापालिकेने सलग दुसऱ्या वर्षी शिक्षक दिनाला कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसल्याने सर्वस्तरातून टीका झाली होती. परंतु, लांबणीवर पडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमाला येत्या आठ दिवसांत मुहूर्त मिळणार आहे. कार्यक्रमासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची 19 सप्टेंबरला तारीख निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे.

देशभरात पाच सप्टेंबरला शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षापासून शिक्षक दिनी कोणतेही कार्यक्रम साजरे केले नव्हते. यामुळे, सर्व स्तरातून टीका होत होती. शिक्षक दिनी शिक्षकांना गौरविण्यात येऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले जाते. मात्र, कार्यक्रम रद्द केल्याने अनेक शिक्षकांनीही नराजी व्यक्त केली होती. यंदाचा कार्यक्रम शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची वेळ मिळाली नसल्याने कार्यक्रम लांबणीवर टाकला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी पाच लाखाचा निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र, नियोजनाअभावी कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला होता. शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी शिक्षण मंत्रीच हवेत, असाही आग्रह काही जणांकडून धरण्यात आला होता. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन इतरही कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र, प्रशासनाला शिक्षक दिनाचा विसर पडल्याने शिक्षक समिती सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठविलेली होती. तसेच, विरोधी पक्षांनीही प्रशासनाला धारेवर धरले होते. यामुळे, महापालिकेने तावडेंची तारीख मिळविण्यासाठी तत्काळ हालचाल केल्याचे दिसून येते. या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्काराची यादी येत्या दोन दिवसात निवड समितीच्या बैठकीत तयार करणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

काही झोपडपट्टी भागातील मद्यपी स्वच्छतागृहात दारुच्या बाटल्या फोडत आहेत. नागरिकांसाठी लाखो रुपये खर्च करुन बांधलेली स्वच्छतागृह समस्यांअभावी बंद आहेत. तर, काही स्वच्छताग़ृहात स्वच्छता नसल्याने नागरिक जात नाहीत. यामुळे, महापालिकेने स्वच्छतागृहात चोवीस तास पाणी, वीज उपलब्ध देण्याची आवश्‍यकता आहे.
फुगेवाडी, खराळवाडी या भागातील स्वच्छताग़ृहात स्वच्छतेचा अभाव आहे. महापालिकेच्या काही स्वच्छताग़ृहात वीजेची सोय नसल्याने रात्रीच्या सुमारास जाण्यास नागरिक घाबरतात. शहरातील काही स्वच्छतागृह बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे, महापालिकेने नागरिकांच्या समस्या सोडविण्याची गरज असल्याचे, भगवान वायदंडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)