महापालिकेच्या शिक्षक गौरव पुरस्कांची घोषणा

पुणे – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या महापालिकेच्या शिक्षक गौरव पुरस्कारांची घोषणा महापौर मुक्‍ता टिळक यांनी केली. पालिकेच्या वतीने एकूण 19 पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील 11 तर खासगी शाळांमधील 8 शिक्षकांचा पुरस्कारांमध्ये समावेश असल्याचे टिळक यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी पालिका हद्दीतील मनपा, खाजगी अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. गेल्या वर्षीपासून शासनाच्या धर्तीवरच पुरस्कार निवडीचे निकष निश्‍चित करण्यात आले आहेत. शिक्षकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या प्रक्रियेमध्ये एकूण 89 जणांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. प्रत्यक्ष मुलाखत आणि पडताळणीसाठी 39 पात्र शिक्षक उपस्थित होते. त्यातून पुरस्कार्थिंची निवड करण्यात आली.

पालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी 10, माध्यमिकसाठी 2, खासगी प्राथमिक शाळेसाठी 3 तर, माध्यमिकसाठी 5 पुरस्कार असे एकूण 20 पुरस्कार देण्याचे निश्‍चित करण्यात आले. पालिकेच्या माध्यमिक शाळेच्या दोन पुरस्कारांपैकी एकाच शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा 19 पुरस्कार देण्यात येणार आहेत. यापूर्वी पुरस्कार्थी शिक्षकांना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. यंदा या सर्व साहित्यासोबतच टॅबही पुरस्कार स्वरूप देण्यात येणार आहे. हे पुरस्कार येत्या 7 जानेवारी रोजी वितरीत करण्यात येणार असल्याचे टिळक यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)