महापालिकेच्या वाहनांचे होणार “ट्रॅकिंग’

स्मार्ट सिटीकडून राबविला जाणार प्रकल्प


एका क्‍लिकवर उपलब्ध होणार माहिती

पुणे – महापालिकेच्या ताफ्यातील घनकचरा, फायर तसेच इतर सर्व वाहनांवर नजर ठेवण्यासाठी स्मार्ट सिटीकडून या वाहनांसाठी “व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’ प्रकल्प राबविला जाणार आहे. “पॅन सिटी’ योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबविला जाणार असून या वाहनांची माहिती स्मार्ट सिटीने उभारलेल्या अत्याधुनिक “कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर’च्या माध्यमातून एका क्‍लिकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत “स्मार्ट एलिमेंट’ प्रकल्पासाठी स्मार्ट सिटीकडून सिंहगड रस्त्यावर “कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर’ उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून शहरातील अत्याधुनिक प्रणाली उभारण्यात आली असून पोलीस, शासकीय कार्यालये, महापालिका तसेच स्मार्ट सिटीसाठी आवश्‍यक असलेली यंत्रणा एका ठिकाणी आहे. त्यातील एक घटक “व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’चा असून वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविल्यास या सेंटरमध्ये संगणक प्रणाली तयार करून एका क्‍लिकवर कोणतेही वाहनाची सद्यस्थिती माहिती करून घेता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या सर्व वाहनांचे “ट्रॅकिंग’ या यंत्रणेच्या माध्यमातून केले जाणार असून त्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटीकडून तयार केला जात असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, महापालिकेसाठी स्वतंत्र ऍप तयार करून या ऍपवर काही ठराविक वाहनांचे नागरिकांना तसेच महापालिका प्रशासनासही ट्रॅकिंग करणे शक्‍य होणार असल्याचे ते म्हणाले.

मागणीनुसार पुरविली जाणार सुविधा
महापालिकेसह इतर शासकीय तसेच निमशासकीय विभागांच्या वाहनांनाही ही सुविधा स्मार्ट सिटीकडून त्यांची मागणी आल्यास उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने पोलीस प्रशासनाचाही समावेश आहे, असे डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले. याशिवाय, अशी ट्रॅकिंग यंत्रणा उभारायची झाल्यास, त्यासाठी मोठा खर्च असल्याने अशी यंत्रणा एकाच ठिकाणी स्मार्ट सिटीकडून उभारली जाणार आहे. त्यामुळे विभागांना केवळ वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम करावे लागणार असल्याचेही डॉ. जगताप म्हणाले. तसेच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ऍपची सुविधाही स्मार्ट सिटीकडून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)