महापालिकेच्या मॅनहोलचा वापर पहा कशासाठी होतोय…

नागपूर : चोरलेले साहित्य कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून नागपुरात तीन बाईक चोरांनी आयडियाची कल्पना खरचं सर्वांसाठी धक्कादायक ठरली आहे. कारण चोरलेली बाईक या चोरांनी विक्री होण्यापूर्वी पोलिसांच्या नजरेपासून लांब ठेवण्यासाठी चक्क महापालिकेच्या मॅनहोल्स आणि सीवर लाईनचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नागपुरातील कैकाडे नगर भागातील हे मॅनहोल आहे. साधारणपणे महापालिकेच्या अशा मॅनहोल्समधून दुर्गंधीयुक्त कचरा बाहेर पडतो. मात्र इथे चोरी गेलेल्या बाईकचा खजिनाच सापडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोनेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत मनीषनगर, बेसा तसेच नागपूर शहरातील इतर भागातून गेल्या काही दिवसात अनेक बाईक चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांचे पथक बाईक चोरांच्या मागावर होतेच. परिसरातील नागरिकांकडून तीन संशयित युवकांबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. 14 जुलै रोजी प्रतीक गिरी, तेजलाल बिसेन आणि एक विधी संघर्ष बालक कैकाडे नगर भागात नव्या सावजच्या शोधात असताना पोलिसांच्या हातात लागले. त्यांच्याकडून चौकशी केली असता तिघांनी नागपुरात 8 बाईक चोरल्याची कबुली दिली.
बाईक चोरल्यानंतर हे चोरटे कधीच ती बाईक घटनास्थळी चालू करत नव्हते. तर ती बिघडली आहे किंवा पेट्रोल संपले आहे, असे सोंग धरत ती पायीच लांबपर्यंत न्यायचे आणि तिथे ती चालू करून पळ काढायचे. खरेदीदार मिळेपर्यंत ती बाईक लपवून ठेवायचे किंवा दुसऱ्या शहरात नेऊन नव्या चोऱ्यांसाठी ती बाईक वापरायचे अशी माहिती तिघांनी पोलिसांना दिली.
दरम्यान, चोरलेल्या बाईक कुठे लपवल्या याची माहिती पोलिसांनी विचारताच तिघांनी दिलेले उत्तर पोलिसांना ही थक्क करणारे होते. तिघांनी चोरीचे माल लपवण्यासाठी चक्क महापालिकेचे मॅनहोल आणि एक सुकलेली सीवर लाईनचा (गटार) वापर केला होता. तर काही बाईक्स जवळच एका झुडुपातही लपवल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)