महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला आर्थिक गंडा

पिंपरी, (प्रतिनिधी) – बॅंकेमधून बोलत असल्याचे सांगून तुमचे बॅंक खाते व एटीएम बंद होणार आहे, असे सांगत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याच्या बॅंक खात्यातील पंधरा हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली.सुलक्षणा कुरणे (वय 45, रा. चिखली) असे गंडा घालण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलक्षणा कुरणे या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचारी आहेत. गुरुवारी (दि.1) त्या महापालिकेच्या मुख्य कार्यालयात काम करत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास एका अनओळखी व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर फोन करुन मी बॅंक ऑफ बडोदा मधुन बोलत असल्याचे सांगून तुमचे बॅंकेचे खाते व ए.टी.एम कार्ड लवकरच बंद होणार आहे, अशी भिती घातली. हे जर थांबवायचे असेल तर मला तुमचा एसएमएस मधील ओटीपी नंबर सांगण्याची मागणी केली. यावर कुरणे यांनी त्या व्यक्तील ओटीपी नंबर दिला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बॅंक खात्यातून एकूण पंधरा हजार रुपये काढण्यात आले. ही बाब लक्षात येताच कुरणे यांनी पिंपरी पोलीसात फिर्याद दिली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)