महापालिकेच्या दोन वाहनचालकांची पदोन्नती रद्द

पिंपरी- वाहनचालक पदी नियुक्ती केलेल्या दोन कर्मचाऱ्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. पदोन्नतीने निवड केलेला कर्मचारी अवजड वाहन चालविण्यास अपात्र ठरला, तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने वैयक्तिक व घरगुती कारणास्तव चालकपदवरील निवड रद्द मागणी केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हे आदेश दिले आहेत. पदोन्नती निवड समितीची 12 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत महापालिका आस्थापनेवरील पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याविषयी शिफारस करण्यात आली होती.

महापालिका सेवेत वॉर्डबॉय पदावर कार्यरत असलेले दीपक सुखलाल परदेशी यांना वाहनचालक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. मात्र, ते अवजड वाहन चालविण्यास अपात्र ठरले.त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात आली. याशिवाय आरोग्य विभागातील गणेश ज्ञानेश्‍वर कार्ले या कर्मचाऱ्याची वाहनचालकपदी पदोन्नती देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. मात्र, वैयक्‍तिक व घरगुती कारणास्तव ही पदोन्नती रद्द करण्याची मागणी कार्ले यीां प्रशासनाकडे केली होती. याची दखल घेत, त्यांची वाहनचालक पदावरील निवड रद्द करण्यात आली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)