महापालिकेच्या दारातच अनधिकृत वाहनतळ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इमारतीबाहेर अनधिकृतपणे वाहने पार्किंग केल्याने इतर वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे, महापालिकेसमोरील रस्त्यावर अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावर अनधिकृतपणे लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोरुन आंबेडकर चौक व गांधीनगहून भोसरीकडे जाण्यासाठी मार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच, या पालिकेसमोर इतर वाहनांना अडथळा ठरतील अशा पध्दतीने चारचाकी लावली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचीही वाहने असतात. गेल्या महिन्यात वाहतूक पोलिसांनी अनधिकृतपणे उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. यावेळी, बाहेरील वाहनांना काही प्रमाणात आळा बसला होता. परंतु, पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाहने लावली जात असल्याने अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे.

-Ads-

महापालिकेच्या अतंर्गत भागात पार्किंगची जागा अपुरी असून सकाळी अकरा नंतर वाहने लावण्यास जागा शिल्लक नसते. तसेच, इमारतीबाहेरील रस्ता अरुंद असून त्यात रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने लावल्याने सकाळी व सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. यामुळे, पादचाऱ्यांनाही चालताना अपघात होण्याची भिती असते. तसेच, पालिकेच्या गेटसमोरच मुख्य रस्ता असल्याने सतत वाहतूक कोंडी असल्याने, पालिकेसमोर वाहतूक पोलिसांची नेमणूक करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्याची आवश्‍यकता असल्याचे, संदीप वडगणे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)