महापालिकेच्या दहा शाळा “स्मार्ट’

पिंपरी – दिल्ली येथील स्मार्ट शाळांच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दहा शाळा प्रायोगिकतत्त्वावर सुधारणार असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. यामध्ये “स्मार्ट सिटी’मध्ये सहभागी असलेल्या सहा शाळा व्यतिरीक्‍त आणखी चार शाळांचा समावेश करत दहा शाळा सुधारण्यात येतील असे महापौरांनी शुक्रवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत जाहीर केले.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले आदी उपस्थित होते.

-Ads-

महापौर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे दिल्ली प्रमाणे सर्व सुविधा आहेत. शाळेची इमारत आहे, शिक्षक आहेत मात्र त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची तशी मानसिकता नाही. यासाठी मुळात मानसिकता बदलणे गरजेचे आहे. यासाठी महापालिका दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे शिक्षकांना आठवड्‌याला शिक्षकांना प्रशिक्षण देते त्याप्रमाणे शिक्षकांनाही प्रशिक्षण देणार तसेच तेथे शाळा समितीवर आयएएस अधिकारी नेमले जातात त्यांच्या कल्पनेवरुन तेथे बदल केले जातात. त्यानुसार आपणही तज्ज्ञ अधिकारी नेमणार असल्याचे महापौर यांनी सांगितले.
एकनाथ पवार म्हणाले की, दिल्ली येथे शाळांचे “ऑडीट’ केले जाते त्या प्रमाणे आपणही महापालिकेच्या शाळांचे “ऑडीट’ करणार आहोत. काही शिक्षकांना दिल्ली येथे पाठवले जाईल. तर दिल्लीतील शिक्षकांना याठिकाणी बोलविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

राहुल कलाटे यांनी शिक्षकांच्या बदलीचा मुद्दा उपस्थित करत आपल्या इथे शिक्षक साधी बदली झाली तरी अस्वस्थ होतात व शिफारस करत बद्‌ली रद्द करतात. मुळात ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे असे सांगितले.
सचिन चिखले यांनी “सीएसआर’द्वारे दिल्ली येथे शाळांमध्ये जे अभिनव उपक्रम राबवले जातात. त्या प्रमाणे आपणही येथे उपक्रम राबवले पाहिजेत तरच तसे बदल आपल्या शाळांमध्येही दिसतील असे सांगितले. यावेळी दिल्ली महापालिकेच्या वतीने मुलांवर केला जाणारा खर्च व तेथील शिक्षकांचे पगार हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेएवढाच आहे. मात्र केवळ आपले शिक्षक त्या मानसिकतेने शिकवत नसल्याची खंत सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

काय होणार बदल?
शाळा समितीवर तज्ज्ञ अधिकारी नेमणार
स्मार्ट उपक्रमात दहा शाळांचा समावेश
सर्व शाळांचे “ऑडीट’ करणार
“सीएसआर’ अंतर्गत शैक्षणिक उपक्रमांवर भर
महापालिका शिक्षकांना आठवड्याला प्रशिक्षण
काही शिक्षकांना प्रशिक्षणासाठी दिल्लीत पाठवणार

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)