महापालिकेच्या जागेवर बेकायदा बांधकाम

निगडी – सेक्‍टर 26 गणेश तलाव येथील संत रोहीदास मंदिरालगत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरु आहे. या बांधकामाला राज्यकर्ते शासकीय निधी देणार असल्याचा आरोप करत बांधकामधारक, राज्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

प्राधिकरणाची ही जागा आहे. ती महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून जागेची देखभाल केली जाते. या जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरु आहे. सेक्‍टर 26 गणेश तलाव येथील संत रोहीदास मंदिरालगत सुरु असलेले बेकायदा बांधकाम थांबविण्याबाबत महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर तक्रार केली आहे. परंतु, त्याची दखल घेतली जात नाही. त्याउलट बांधकाम जोरात सुरु आहे. या बेकायदा बांधकामाला काही राज्यकर्ते आपला शासकीय निधी देणार असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र सरकारने 2015 नंतरच्या बेकायदेशीर बांधकांना, अतिक्रमणांना संरक्षण, प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध एमआरटीपी ऍक्‍ट 52, 53, 54 नुसार कारवाई करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार निगडीत बेकायदा बांधकाम करणाऱ्यांवर आणि त्याला शासकीय निधी देणाऱ्या राज्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन आणि धर्मादाय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या पत्रावर 150 स्थानिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)