महापालिकेच्या कारभाराविरोधात धरणे आंदोलन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. वाढीव दराच्या निविदा मंजूर केल्या जातात. विना निविदा थेट पद्धतीने कामे दिली जातात. त्याला महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांचे पाठबळ असल्याचा आरोप करत बहुजन सम्राट सेनेच्या वतीने मंगळवारपासून (दि. 29) पिंपरी चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

बहुजन सम्राट सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष निसर्गंध यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकासमोर धरणे धरण्यात आले आहेत. यामध्ये नानासाहेब मांदळे, शिवशंकर उबाळे, बाबुराव मदणे, संतोष जोगदंड, धम्मराज साळवे, विक्रम ठोकळ, अविनाश भालेराव आदी सहभागी झाले आहेत. महापालिकेतील भ्रष्ट कारभाराला आवर घालण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. वाढीव दराची निविदा प्रक्रिया तसेच थेट पद्धतीने दिलेली कंत्राटे या कारभाराची चौकशी करण्याचे ठोस आश्‍वासन मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंदोलनाबाबत अधिक माहिती देताना संतोष निसर्गंध म्हणाले की, महापालिकेच्या कारभाराची तसेच आयुक्त हर्डीकर यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही. महापालिकेकडे साधी विचारणा देखील केली नाही. त्यामुळे महापालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. महापालिकेतील स्थायी समितीचा निर्धारीत कालावधी पुर्ण होत असल्याने जादा दराच्या निविदा मंजूर करण्याचा सपाटा सुरू आहे. ठेकेदारांना हाताशी धरून जादा दराचे निविदा मंजूर केल्या जात आहे. संतपीठ, वडमुखवाडी रस्ता, पंतप्रधान आवास योजना, चऱ्होली लोहगाव रस्ता, वायसीएममधील डॉक्‍टर यांची निवासस्थानाची डागडुजीच्या निविदेत मोठा गैरव्यवहार झाला आहे.

याविरोधात सामाजिक संघटनांनी आवाज उठवूनही दखल घेतली जात नाही. पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदार संगनमताने महापालिका लुटण्याचे काम करत आहेत. या कारभाराची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी संतोष निसर्गंध यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)