महापालिकेचे दैनंदिन कामकाज ठप्प ; नगरकर त्रस्त

सर्वच अधिकारी निवडणुकीच्या कामात : नगरकर त्रस्त

नगर: महापालिका निवडणुकीत सहायक निवडणूक अधिकारीपदावर महापालिकेचे बहुतांशी अधिकाऱ्यांची नियुक्‍त करण्यात आल्याने महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम झाला असून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. यापूर्वी महापालिका निवडणुकीसाठी बहुतांशी महसूल अधिकारीची नियुक्‍ती केली जात असे. परंतू यावेळी जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांऐवजी महापालिकेतील बांधकाम, पाणीपुरवठा, नगररचना या विभागाच्या अभियंत्यांची नियुक्‍ती सहायक निवडणूक अधिकारी म्हणून केली आहे. त्याचा परिणाम महापालिकेचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.

-Ads-

महापालिकेत अधिकारीच निवडणुकीच्या कामात गुंतल्याने अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फावले आहे. ज्यांची महापालिका निवडणुकीसाठी नियुक्‍ती झाली नाही. तेही निवडणूक कामांचे कारण सांगून कामकाज करण्याचे टाळत आहे. निवडणुकीमुळे आता नागरिकांचे महापालिकेत काही कामे नाही असे नाही तर अनेक प्रश्‍न घेवून नागरिक दररोज महापालिकेत येत आहे. परंतू अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे रेंगाळली आहेत. महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा व नगररचना विभागातील अभियंत्यांची निवडणुकीसाठी नियुक्‍ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी प्रामुख्याने महसूल अधिकाऱ्यांची नियुक्‍ती होते. पण यावेळी आयुक्‍तांनी बहुतांशी महापालिकेची यंत्रणात यात गुंतविल्याने दररोजच्या कामकाजावर त्यांचा परिणाम झाला आहे. शहर अभियंतांना देखील यावेळी निवडणुकीत सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्‍ती केले आहे.

या निवडणुकीत तब्बल 9 अभियंत्यांवर सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाचे सर्वच अधिकारी या कामात गुंतले आहे. त्यामुळे पाण्याची कोणतीही समस्या निर्माण झाली तर नागरिकांना आता निवडणूक संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)