महापालिकेचे कंत्राटी सुरक्षा रक्षक आर्थिक संकटात

पिंपरी – शहरातील महापालिकेच्या विविध ठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांचे पगार वेळेत होत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. महापालिकेचा संबंधित विभागाने महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पगार करणे अपेक्षित असल्याचे अनेक सुरक्षा रक्षकांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे वायसीएम रुग्णालय, महापालिका इमारत, नाट्यगृहे, उद्याने यासारख्या विविध ठिकाणी कंत्राटी पध्दतीने खासगी कंपनीचे सुरक्षा रक्षक भरण्यात आलेले आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून पगार वेळेवर होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कंत्राटी सुरक्षा रक्षकांना पगार आठ ते नऊ हजार आणि तो महिन्याच्या अखेरीस मिळत असल्याने ते दुहेरी संकटात सापडलेले आहेत.

या सुरक्षा रक्षकांचे पगार कमी असून वेळेवर होत नसल्याने कुटुंबाचा उदर्निवाह कसा चालवायचा असा प्रश्‍न समोर उभा राहिला आहे. वायसीएम रुग्णालयात 35 ते 40 कंत्राटी पध्दतीचे सुरक्षा रक्षक भरले असून शहरात खासगी कंपनीचे सुमारे 250 सुरक्षा रक्षक आहेत. त्यांची रोजची 8 तासाची ड्यूटी असून रोज तीन पाळीमध्ये काम करावे लागते.

या सुरक्षा रक्षकांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. कंत्राटी पध्दतीच्या सुरक्षा रक्षकांचे महिन्याचे हजेरीपत्रक 1 तारखेला सुपरवायझर पुण्यातील कार्यालयात पाठवितात. त्या कार्यालयातून पाच ते सहा तारखेला सर्व सुरक्षा रक्षकांचे पगारपत्रक महापालिका कार्यालयात येऊनही त्यांच्या खात्यावर पगार वेळेत होत नाहीत. तसेच, पगार तुटपुंजा असल्याने कुटुंबाचा खर्च भागत नसल्याची खंत अनेकांनी “प्रभात’शी बोलताना मांडली

वेतनवाढीची मागणी फाट्‌यावर
प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान आमचा पगार होतो. गेल्या सहा महिन्यापूर्वी पगार वाढविणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापपर्यत पगारात वाढ झाली नाही. अतिशय प्रामाणिकपणे सेवा करुनही तटपुंज्या पगारात नोकरी करावी लागत आहे. तो पगारही वेळेवर होत नाही. गेल्या सहा महिन्यात फक्त दिवाळीला 12 ते 13 तारखेच्या दरम्यान पगार झाला आहे. आमच्या पगारावार कुटुंबाची गुजराण होत असल्याने तो वेळेवर होणे गरजेचे असल्याची अपेक्षा सुरक्षा रक्षकांनी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)