महापालिकेची “हायटेक’ उपक्रमशिल शाळा

पिंपरी – महापालिकेची शाळा म्हटलं की नाक मुरडलं जातं. गुणवत्तेवरुन कायम ताशेरे ओढले जात असताना इतर उपक्रम तर या शाळांच्या गावीही नसतात. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेची अजंठानगर येथील माता रमाबाई आंबेडकर मुलांची शाळा अपवाद ठरली आहे. सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, गांडुळ खत, रेन वॉटर हार्वेस्टींग, कुंडी प्रकल्प, औषधी वनस्पती प्रकल्प, योगा, वाचन प्रकल्प यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत असून विद्यार्थ्यांना चक्क “ई-लर्निंग’ची सुविधा आहे. त्यामुळे शाळेने नुकतेच “आयएसओ’ मानांकनही पटकावले आहे.

अजंठानगर येथील शाळा बालवाडी ते सातवीपर्यंत आहे. या शाळेला आदर्श शाळा पुरस्कारही मिळाला आहे विशेष म्हणजे या शाळेतील विद्यार्थ्यांना असणारी शिस्त वाखाणण्याजोगी असल्याचे दिसून आले. यामुळेच, ही शाळा नावारुपाला आलेली आहे. या शाळेत प्रत्येक महिन्याला पालक मेळावा होत असल्याने पालकांनाही विद्यार्थी कोणत्या विषयात कमी पडत आहे हे लक्षात येते. सध्याच्या काळात इंग्रजी माध्यमातील खासगी शाळांचे स्तोम वाढत असल्याचे दिसून येते. परंतु, अजंठानगर शाळेची गुणवत्ता पाहून यंदा अनेक विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला असल्याचे दिसून येत आहे. या शाळेतील वर्षा सावंत व संगीता चटणे या शिक्षिकांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या शाळेत कात्रण प्रकल्पाची विशेष चर्चा असते. या प्रकल्पात विद्यार्थी अनेक माहितीपर कात्रणे एकत्रित करुन ती पुस्तकरुपात तयार करतात. यामुळे, विविध विषयांचा स्पर्श विद्यार्थ्यांला होऊन तो बहुतांशी प्रमाणात ज्ञानार्जनी बनत आहे. या शाळेत असलेल्या प्रयोग शाळेमुळे विद्यार्थ्यांना कमी वयात विज्ञानातील विविध उपकरणे हाताळायला मिळत असल्याने त्यांच्या गुणवत्ता वाढीस निश्‍चितपणे फायदा होत आहे. तसेच, शाळेत सुसज्ज संगणक कक्ष तयार करण्यात आल्याने विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक प्रगत होताना दिसत आहेत. या शाळेतील कुंडी प्रकल्पात 150 कुंड्या ठेवण्यात आल्या असून त्यामध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात आलेली आहेत.

शाळेमध्ये पर्यावरणपूरक अनेक प्रकल्प राबविले जात असून नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वापर करुन विद्यार्थ्यांना शिकविण्याकडे भर असतो. तसेच, शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात विद्यार्थ्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे, शाळेच्या मुख्याध्यापिका सईद रजनी यांनी सांगितले.

शाळेतील नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचा कल आमच्या शाळेकडे वाढलेला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबबिले जात असल्याने विद्यार्थी अधिक प्रगल्भ बनत आहेत. तसेच, पुढील वर्षी शाळेत आठवीचा वर्ग वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
सतीश पाटील, शिक्षक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)