महापालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई

पुणे – महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन एक आणि दोनच्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. त्यातील झोन एकमध्ये 4400 चौ. फूट क्षेत्र आणि झोन दोनमध्ये 3145 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

झोन एकमध्ये मुंढवा, केशवनगर येथील सर्वे नं. 25 येथील संदीप कवडे यांचे 1600 फूट, रोहन कवडे यांचे 400 चौ. फूट, सचिन घावटे यांचे 450 चौ. फूट, व्यंकटेश वर्धा यांचे 350 चौ. फुट, निखील शिंदे यांचे 1600 चौ. फूट असे एकूण 4400 चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. झोन दोनच्या वतीन कात्रज येथील नवीन हद्दीत असलेल्या सुखसागर नगर येथील भाग एक, सर्वे नं. 12-13 पार्ट येथील बांदल प्रसाद यांचे 900 चौ. फूट आणि व्ही. व्ही. तांबे यांचे 1800 चौ. फूट असे एकूण 2700 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे.

झोन दोनमध्ये कोंढवा बुद्रुक येथील सर्वे नं. 5 पार्त, शिवशंभोनगर मधील कुरेशी मुनीर यांचे 192 चौ. फूट, अहमद खान यांचे 128 चौ. फूट, आरिफ शेख यांचे 125 चौ. फूट असे एकूण 445 चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)