महापालिकेचा हॉटमिक्‍स प्लान्ट बंद

ठेकेदाराला दंड करण्याचे महापौरांचे आदेश

पुणे – महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीसाठी डांबर आणि खडी मिक्‍स करण्याचा हॉटमिक्‍स प्लान्ट चक्‍क महापालिकेस खडी मिळत नसल्याने बंद असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. येरवडा भागात एका कार्यक्रमानिमित्ताने गेलेल्या महापौरांनी या ठिकाणी अचानक भेट दिली. यावेळी ही बाब उघडकीस आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येरवडा येथे महापालिकेचा हॉट मिक्‍स प्लान्ट असून त्या ठिकाणाहून शहरात संपूर्ण वर्षभर डांबर मिश्रित खडी वितरित केली जाते. त्यातून रस्त्याची दुरुस्ती केली जाते. या प्लान्टला खडी पुरविण्यासाठी तीन ठेकेदारांना संपूर्ण वर्षभराचे काम देण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही हा प्लान्ट आजच बंद असल्याने महापालिकेस खडी मिळत नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, महापौरांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत. या प्लान्ट मधून दररोज केल्या जाणाऱ्या कामाचा आढावा सादर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. अशा प्रकारे हा प्लान्ट बंद असणे ही गंभीर बाब असून या पुढे असे प्रकार होणार नाहीत, यासाठी तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना यावेळी महापौरांनी पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना दिल्या. तसेच तातडीने खडी उपलब्ध करून देण्याच्या सूचना ठेकेदारांना देऊन त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे आदेशही दिले.

दिवसाला 1 लाख दंडाची तरतूद
महापालिकेने या ठेकेदारांना दिलेल्या कामाच्या करारानुसार त्यांनी एक दिवस जरी खडी पुरविली नाही, तरी त्यांना प्रतिदिन 1 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र, त्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याचे महापौरांनी सांगितले. याबाबत ऑक्‍टोबर 2018 मध्ये प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना देण्यासाठी तयार केलेले पत्र जानेवारी महिना आला तरी दिलेले नसल्याचे महापौरांनी घेतलेल्या माहितीमधून समोर आले आहे.

अहवाल सादर करा
या वेळी महापौरांनी तातडीने या प्लान्टच्या मागील वर्षभराच्या कामकाजाचा आढावा सादर करण्याच्या सूचना पथ विभागास दिल्या आहेत. त्यत या प्लान्टचा वापर किती दिवस झाला, दररोज किती हॉटमिक्‍स तयार झाले, ते कोठे आणि किती वापरले, किती खडी घेतली गेली, याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले असल्याचे महापौर मुक्‍ता टिळक यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)