महापालिकेचा प्रताप : झेड ब्रीजवर रातोरात रस्ता

सिमेंट रस्त्यावर डांबराचा थर

पुणे – मध्यवर्ती भागात असलेल्या झेड ब्रीजवरील रस्ते कॉंक्रिटचे असताना त्यावर चक्‍क डांबरीकरणाचा थर चढविण्ल्याचा प्रकार समोर आला आहे. हे काम शुक्रवारी रात्री केल्याने कॉंक्रिट रस्त्यासाठी केलेला खर्च वाया गेल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे.

-Ads-

डेक्कन ते नारायण पेठेला जोडणारा झेड ब्रीज रस्ता फक्‍त दुचाकी वाहनांसाठी आहे. या पुलावरील दोन्ही लेन या कॉंक्रिटच्या आहेत. फक्‍त दुचाकी धावत असल्याने हा रस्ता सुस्थितीत होता. पण, या रस्त्याच्या एका बाजूला डांबरीकरण केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कर रूपाने विकासकामांसाठी जमा केलेला पैसा महापालिकेकडून अनावश्‍यक कामांसाठी उधळला जात असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने आयुक्तांकडे केली आहे. तसेच या संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्यांच्या वेतनातून या कामाचा खर्च वसूल करावा, अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)