महापालिकेचा ई-लर्निंग प्रकल्प अखेर सुरू

200 डिजीटल आणि 42 व्हर्चुअल क्‍लासरूम : 21 कोटींचा आला खर्च

पुणे – महापालिका शाळांमधील मुलांसाठी 21 कोटी खर्चून उभारल्या जाणाऱ्या ई-लर्निंग प्रकल्पास अखेर मुर्हूत मिळाला असून, पालिकेच्या 42 शाळांमध्ये व्हर्चूअल व 200 डिजीटल क्‍लासरूम शिक्षक दिनापासून कार्यरत करण्यात आल्या आहेत. तसेच, उर्वरीत शाळांमध्येही तातडीने हा प्रकल्प सुरू करण्यावर भर राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेच्या 287 शाळांमधील 1 लाख मुलांसाठी हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठीचे काम बीएसएनएनला देण्यात आले आहे. या कामाची सुरुवात मार्च 2018 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत म्हणजे जून 15 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, हे कामच पुढे न सरकल्याने महापालिकेने चार टप्प्यांत करण्याचा निर्णय घेत, पहिल्या टप्प्यात 50 शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, 5 सप्टेंबर 2018 पर्यंत पहिला टप्प्यात हा प्रकल्प कोणत्याही स्थितीत सुरू करण्याच्या सुचना संबंधित कंपनीस दिल्या होत्या. त्यानंतरही कंपनीस अखेर 42 शाळांमध्येच ही व्हर्चुअल क्‍लासरूम सुरू करण्यात आली आहे. तर, 200 शाळांमध्ये डिजीटल क्‍लासरूम सुरू केले असून त्या ठिकाणी ई-लर्निंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मुख्य स्टुडीओही सुरू
सर्व शाळांमध्ये उभारल्या जाणाऱ्या व्हर्चुअल क्‍लासरूमला जोडला जाणारा डिजीटल स्टुडीओची उभारणी शिक्षण विभागाच्या मुख्य इमारतीमध्ये पूर्ण झाली आहे. या स्टुडीओमधून संबंधित विषयांचे तज्ज्ञ एकाचवेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकणार आहेत. तसेच, महापालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनाही एकाचवेळी शिक्षक तसेच मुलांशी संवाद साधणे शक्‍य होणार, असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)