महापालिकेकडून 33 ठिकाणी ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी

स्तनदामातांची गैरसोय टळणार : विसर्जन घाट आणि मिरवणूक मार्गावर सुविधा

पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या स्तनदामातांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेकडून यंदापासून विसर्जन घाटावर 33 ठिकाणी “हिरकणी कक्ष’ उभारण्यात आले आहे. आयुक्त सौरभ राव यांनी गणेशोत्सवाच्या तयारीच्या बैठकीत याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विसर्जन घाट आणि मुख्य मिरवणूक मार्गावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

-Ads-

शहरात गणेश चतुर्थीच्या दिवशी सुमारे पाच ते साडेपाच लाख गणेशमूर्तींचे विसर्जन होते. तसेच, मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळांची मिरवणूक लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, शास्त्री रस्ता आणि टिळक रस्त्याने निघते. या मिरवणुका पाहण्यासाठी लाखो पुणेकर या दिवशी रस्त्यावर गर्दी करतात, तसेच विसर्जन घाटावरही मोठी गर्दी असते. या भाविकांमध्ये कुटुंबासह अनेक स्तनदामाताही सहभागी होतात. मात्र, अनेकदा बाळाला दूध पाजण्यासाठी त्यांना सुरक्षित जागा मिळत नाही. त्यांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त राव यांनी आढावा बैठकीत याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने 22 विसर्जन घाट आणि मुख्य विसर्जन ठिकाणी हे कक्ष उभारले असून त्या ठिकाणी स्तनदामातांना बसण्याची सुविधाही देण्यात आली आहे. या शिवाय, या ठिकाणी बाहेरील बाजूस सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात येणार आहेत. तसेच, या कक्षाच्या बाहेरील बाजुस “हिरकणी कक्ष’ असे सूचना फलक लावण्यात आले असून ते भाविकांना निदर्शनास येतील अशा प्रकारे लावण्यात आल्याचे मोळक यांनी स्पष्ट केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)