महापालिका साजरा करणार संविधान दिन

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने येत्या 26 नोव्हेंबरला सविधान दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या खर्चाच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली. स्थायी समिती सभागृहात मंगळवारी (दि.13) पार पडलेल्या साप्ताहिक सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

याबाबत स्थायी समिती सदस्य विकास डोळस यांनी माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना पूर्ण करून, 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी 26 जानेवारी 1950 पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली. त्या घटनेला 69 वर्षे होत असून, 26 नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करण्याचे सरकारचे आदेश आहेत. या दिवसापासून देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था अस्तित्वात आली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. याबाबत समाजामध्ये पुरेशी जागरूकता नसल्याने लोकशाहीवर निष्ठा असलेल्या संघटनांच्या मागणीनुसार राज्य सरकारने 2008 मध्ये शासकीय अध्यादेश काढला आहे. त्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याकरिता विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती डोळस यांनी दिली.

संविधान दिन साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला असला, तरी संविधान दिन साजरा करण्याबाबत मोठी उदासिनता दिसून येते. केवळ शासकीय पातळीवर हा दिवस साजरा केला जात असून संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असे आवाहन स्थायी समिती सदस्य विलास मडीगेरी यांनी केले आहे.
संविधान दिनाबाबत जनजागृती व्हावी, याकरिता प्रबोधनात्मक विविध कार्यक्रम, संविधान शाहिरी जलसा, विविध स्पर्धांकरिता येणाऱ्या खर्चाच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

विविध संस्था, संघटनांकडून महापालिकेचे अभिनंदन
संविधान दिन साजरा करण्यासाठी शहरातील विविध संस्था संघटना पुढाकार घेत असतात. त्यानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये राज्यघटना प्रस्ताविक व राज्यघटना प्रत देऊन जनजागृती केली जात आहे. शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या संविधान सन्मान रॅली-2018 या व्हॉटस्‌ अप ग्रुपची निर्मिती करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबरला शहरात भव्य दुचाकी व चारचाकी वाहन रॅली काढण्याचे नियोजन सुरू आहे. या ग्रुपमधील सर्व सदस्यांनी महापालिका स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)