महापालिका शिष्यवृत्ती वाटपाला सुरुवात

पुणे – विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वेळीच योग्य दिशा आणि उपयुक्त मार्गदर्शन मिळाले पाहिजे, योग्य दिशा आणि मार्गदर्शन यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. शैक्षणिक प्रगती करीत असताना कौशल्य विकासासाठी विविध मार्गदर्शन वर्ग, विविध संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि त्याचा मानसिकतेचा पालकांनी विचार करून त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याला संधी दिली पाहिजे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी केले.

महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने 10 वी 12 वीच्या पात्र विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य धनादेशाचे वितरण महापौरांच्या हस्ते झाले. यावेळी महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले, समाज विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात 30 विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य धनादेश देण्यात आले.

10 आणि 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. भविष्यकाळात शैक्षणिक प्रगती साधत असताना विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि प्रोत्साहन देण्याबरोबरच अर्थसहाय्य देण्याचे काम महापालिका करत असल्याचे महापौर म्हणाल्या.

यंदा 12 वी उत्तीर्ण झालेल्या 2,752 आणि 10 वी उत्तीर्ण झालेल्या 6,868 अशा 9,620 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. सूत्रसंचालन मुकूंद महाजन यांनी केले; तर समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)