महापालिका शाळेतील पोषण आहारपद्धत्ती उत्तम

बर्मीगहॅम सिटी काऊन्सिलच्या सदस्यांकडून कौतुक

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 13 – महापालिका शाळेतील मुलांसाठी सुरू केलेली पोषण आहार पद्धत्ती उत्तम आहे. ज्या किचनमध्ये हा पोषण आहार तयार केला जातो त्याची व्यवस्था नियोजनबद्ध आहे. स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते, ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगत इंग्लड येथील बर्मीगहॅम सिटी काऊन्सिलच्या सदस्यांनी पुणे महानगरपालिका आणि श्रीराम व्यवसाय गट व ग्रुपच्या स्टिम राईस प्रोजेक्‍टचे कौतुक केले.

पुणे शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पोषण आहार कशाप्रकारे दिला जातो. त्याची प्रक्रिया काय, त्याची पाहणी करण्यासाठी आणि या समान उद्दीष्टांवर आधारित बर्मीगहॅम शहरात पोषण आहार कार्यक्रम राबविण्यासाठी या सदस्यांनी पुणे शहराला भेट दिली. त्यावेळी यशदा येथे पुणे महानगरपालिका आणि बर्मीगहॅम सिटी काउन्सिल सदस्य यांची संयुक्त बैठक पार पडली. त्यामध्ये पोषण आहार कार्यक्रम अंतर्गत चर्चा करून, अनुभव कथन करण्यात आले. यावेळी बर्मीगहॅम सिटी काऊन्सिलचे कार्यकारी संचालक ऍना टेलर, संचालक डॉ. ऍन्ड्रीयन फिलीप्स, समुपदेशक पॉवलेट हॅमलटन यासह शिक्षणप्रमुख शिवाजी दौंडकर, शालेय पोषण आहाराचे अधिक्षक मदन हागवणे, सहाय्यक अधिकारी शिवाजी बोकारे आणि मुख्याध्यापिका शुभांगी नाईक, श्रीराम व्यवसाय गट व ग्रुपच्या स्टिम राईस प्रोजेक्‍टचे राजेश गायकवाड उपस्थित होते.

यावेळी सदस्यांनी कोथरूड येथे शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या किचनला आणि महापालिकेच्या क्रमांक 55 जी या शाळेला भेट दिली. श्रीराम व्यवसाय गट व ग्रुपच्या स्टिम राईस प्रोजेक्‍टच्या माध्यमातून हा पोषण आहार मुलांना दिला जातो. त्यामुळे सदस्यांनी किचनची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी तेथील स्वच्छता, नियोजन, पोषण आहार तयार करण्याच्या पद्धत्ती, तेथील कर्मचाऱ्यांचे राहणीमान याची पाहणी करून महापालिकेचे आणि किचन व्यवस्थापकांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी मुलांबरोबर पोषण आहाराचा आस्वादही घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी नाईक यांनी केले तर, किचन व्यवस्थापक राजेश गायकवाड यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
21 :thumbsup:
5 :heart:
1 :joy:
4 :heart_eyes:
14 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)