महापालिका शाळांमध्ये “गीत मंच’ उपक्रम

पिंपरी – शहरातील महापालिकेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील काही शिक्षक प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी आनंददायी शिक्षण अंतर्गत “गीत मंच’ उपक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमाला शिक्षण विभागाने नुकतीच परवानगी दिलेली आहे.

या कार्यक्रमात प्रार्थना समूह गीत, पोवाडा, कथाकथन, स्फूर्ती गीते यासारख्या पारंपारिक गीतांचा सराव विद्यार्थ्यांकडून करुन घेतला जाणार आहे. यामध्ये, महापालिका शाळांमधील गायन क्षेत्रात जाधववाडी शाळेतील सुरेश मिसाळ व निवेदक क्षेत्रात शैलेजा गायकर, हार्मोनिअमध्ये पिंपळे निलख शाळेतील धर्मेद्र भांगे हे शिक्षक विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाचे धडे देणार आहेत.

या उपक्रमाचे संयोजक मिसाळ म्हणाले, शिक्षणातून मुलांना आनंद मिळाला पाहिजे. केवळ निरस अध्यापनातून विद्यार्थी घडणार नसून विद्यार्थ्यांचा शारिरीक, मानसिक, भावनिक विकास होणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात हार्मोनिअम, तबला, ढोलकी, या साधनांचा वापर करुन विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेतला जाणार आहे. काही गीतांसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टिमचीही मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.

शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे म्हणाल्या, महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये टप्प्या-टप्प्याने कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. तसेच, शालेय कामकाजात कोणताही अडथळा येणार नाही, या अटीवर शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)