महापालिका शाळांमध्येही ‘वन्दे मातरम चे सूर निनादणार

मुंबई पाठोपाठ पुण्यातील शिवसेना नगरसेवकांचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

प्रभात वृत्तसेवा

पुणे – हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी ठरलेले आणि प्रखर राष्ट्राभिमान जागवणारे “वन्दे मातरम’ हे गीत आता पुणे महापालिकेच्या सर्व शाळामध्ये गायले जावे आणि प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र बसविण्यात यावे असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे आणि विशाल धनवडे यांनी स्थायी समितीला दिला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईपाठोपाठ आता पुणे महापालिकेच्या शाळामध्ये “वन्दे मातरमऽऽ’ गायले जाणार आहे.

प्रत्येक देशवासियाच्या मनात देशभक्ती आणि देशप्रेम जागृत करण्यामध्ये “जन गण मन’ या राष्ट्रगीताप्रमाणे बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या “वन्दे मातरम’ या राष्ट्रीय गीताचेही अढळ स्थान आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी ठरलेले आणि प्रखर राष्ट्राभिमान जागवणारे हे गीत आता पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये गायले जावे. त्याचबरोबर या शाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र बसविण्यात यावे,असा प्रस्ताव भानगिरे आणि धनवडे यांनी स्थायी समितीला दिला आहे. स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर तो मुख्यसभेत पाठवण्यात येईल. मुख्यसभेच्या मंजुरीनंतरच या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)