महापालिका शाळांना सुट्टी

पिंपरी – सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारलेल्या “महाराष्ट्र बंद’च्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व खासगी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

“”मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जुलै रोजी पुकारलेल्या बंदमध्ये चाकण, राजगुरुनगर, खेड या भागात आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनात पोलीस वाहने, खासगी वाहने पेटविण्यात आली होती. यामध्ये, मोठ्या प्रमाणात सरकारी व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. अनेक पोलीस, आंदोलक जखमी झाले होते. महाराष्ट्र बंदमध्ये राज्यभरात रास्ता रोको, रेलरोको, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरुवारी होणाऱ्या आंदोलनात खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, महापालिकेकडून उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे, शिक्षण प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)