महापालिका विद्यार्थ्यांची पायपीट दूर

वाहतूक सुविधा : शिक्षण समितीची प्रस्तावाला मंजुरी

पिंपरी – चऱ्होली, वडमुखवाडी, रावेत आणि पुनावळेतील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत येण्यासाठी आणि जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विद्यार्थी बस सुविधेमुळे पाच शाळांमध्ये शिकत असलेल्या 270 विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

समाविष्ठ भागातील चऱ्होलीच्या पंडीत जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेतील आणि वडमुखवाडी येथील मनपाच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लांबून प्रवास करत शाळेत यावे लागते. घरापासून शाळेत येण्याजाण्यासाठी त्यांची गैरसोय होत असल्याने या दोन्ही शाळांना विद्यार्थी वाहतूक बस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नगरसेविका सुवर्णा बुर्डे, विनया तापकीर, माजी महापौर नितीन काळजे यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे घर आणि शाळा यामधील प्रवास अंतर दोन ते तीन किलोमीटर आहे, असा अहवाल पर्यवेक्षिका पुष्पा माने यांनी शिक्षण विभागाला सादर केला आहे.

रावेत येथील बबनराव भोंडवे प्राथमिक आणि पुनावळे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देखील बराच अंतर कापून यावे लागते. या विद्यार्थ्यांना डोअर स्टेप या सामाजिक संस्थेमार्फत प्रवासी सुविधा पुरविली जात होती. त्यांची मुदत नोव्हेंबर 2018 अखेर संपुष्टात आली. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना पदर खर्च करून शाळेत यावे लागत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना हे परवडणारे नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांना मनपाने प्रवासी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी शिफारस नगरसेविका संगिता भोंडवे, रेखा दर्शले यांनी केली होती. त्यावर शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांनी देखील संबंधित शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली आहे. त्यानुसार वरील पाच शाळांसाठी विद्यार्थी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आज गुरूवारी (दि. 6) शिक्षण समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला. त्याला शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांनी मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव खर्चीक बाबीचा असल्यामुळे तो मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर प्रवासी सुविधेचा खर्च शाळांसाठी प्राप्त होणार आहे.

शाळेतील विद्यार्थी संख्या अहवाल

शाळेचे नाव आणि विद्यार्थी संख्या
– चऱ्होली प्राथमिक शाळा 48
– वडमुखवाडी प्राथमिक शाळा 29
– पुनावळे कन्या प्राथमिक शाळा 60
– पुनावळे मुले प्राथमिक शाळा 81
– रावेत प्राथमिक शाळा 52
– एकूण 270


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)