महापालिका लाभार्थ्यांच्या प्रतिक्षेत!

पिंपरी – कल्याणकारी योजनेंतर्गत नागरिकांना अर्थसहाय्य देण्यासाठी महापालिकेने आवाहन करुनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. गरजूंना विविध योजनांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने इतर कल्याणकारी योजना (अ), महिला व बालकल्याण योजना, अपंग कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, इतर कल्याणकारी योजना (ई) या योजनांतर्गत 28 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. शहरातील पालिकेच्या माध्यमिक शाळा वगळता इतर शाळेतील इयत्ता दहावीमध्ये 80 ते 90 टक्के गुण घेणाऱ्या तसेच 90 टक्केपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि इयत्ता 12 वीमध्ये 80 टक्के व त्याहून अधिक गुण मिळविण्याऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाते. त्यासाठी 6 सप्टेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावीनंतरचे आयटीआय किंवा अभियांत्रिकी प्रशिक्षण घेणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेणे, बारावीनंतरचे वैद्यकीय व अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य यासाठी 18 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावयाचे आहेत.

अपंग कल्याणकारी योजनेंतर्गत अंध, अपंग (दिव्यांग) कर्णबधीर विद्यार्थ्यांना बारावीनंतरचे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी, अपंग व्यक्तींची उपयुक्त साधने घेण्यासाठी, मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच बारावीनंतर वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी आणि परदेशातील उिच्च शक्षणासाठी संबंधितांनी पालिकेचे आर्थसहाय घ्यावे. इतर कल्याणकारी योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच एचआयव्ही किंवा एड्‌स बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या पालकांनी व संस्थांनी अर्थसहाय घ्यावे, त्यासाठी 18 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)