महापालिका रणसंग्राम २०१८: युवक कॉंग्रेसला शिवसेनेकडून भगदाड

युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरव ढोणे शिवसेनेत दाखल

नगर: महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे गुऱ्हाळ मुंबईत सुरू असतानाच नगरचे युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरव ढोणे कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल झाले आहे. शहरात कॉंग्रेसची ताकद अगोदरच कमी असताना गौरव ढोणे यांच्या रुपाने असलेली युवा ताकद देखील शिवसेनेने खेचून घेतली आहे.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्या उपस्थित त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, समन्वयक घनश्‍याम शेलार, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, नगरसेवक सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, गिरीष जाधव आदी पदाधिकारी यांनी ढोणे व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. राठोड म्हणाले, “शिवसेना नगरकरांसाठी नेहमीच तत्पर आहे. युवकांना शिवसेनेच्या माध्यमातून शहरात समाज सेवेच केली आहे. गुंडगिरी व दहशतीचे कोण दर्शन घडवितो, हे नगरकरांना सर्वश्रृत आहे.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
12 :thumbsup:
5 :heart:
29 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
1 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)