महापालिका रणसंग्राम २०१८: मामाचा मुलगा ओंकार भाजपात ;  राष्ट्रवादीला जोरदार धक्‍का

नगर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक कै. कैलास गिरवले यांचा मुलगा ओंकार यांच्यासह त्याचे चुलते बाबासाहेब गिरवले यांनी गुरुवारी रात्री अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्‍का बसला आहे. राष्ट्रवादीने गिरवले यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले होते. परंतू आता या प्रक्रियेला ब्रेक बसण्याची शक्‍यता आहे.

माळीवाडा भागात कै.कैलास गिरवले यांचे मोठे वर्चस्व आहे. केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कै. कैलास गिरवले यांना अटक करण्यात आली होती.ते पोलीस कोठडीत असतांना त्याचे निधन झाले होते. या प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेसह भाजपला चांगलेच कोंडीत पकडले होते. सरकारच्या चुकीच्या धोरणावरून भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप राष्ट्रवादीने केला होता. आता शिवसेनेचे कोंडी करण्यासाठी गिरवले यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा घाट राष्ट्रवादीने घातला होता.

परंतू गिरवले यांच्या मुलाने राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपची वाट धरली. मंगळवारी ओंकार गिरवले यांनी भाजपकडे मुलाखत देखील होती. तेव्हा पासून गिरवले हे भाजपत जाणार अशी चर्चा होती. गुरुवारी रात्री जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत गिरवले काका-पुतण्याने भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आमदार सुजितसिंह ठाकूर, ऍड. अभय आगरकर, सुनील रामदासी, किशोर बोरा, बाबासाहेब वाकळे शशिकांत गायकवाड, अनिकेत लोंढे, ऐश्वर्या गारडे आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
21 :thumbsup:
3 :heart:
1 :joy:
11 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)