महापालिका रणसंग्राम २०१८: मतदार यादी घोळावर राजकीय हरकतींची दहशत 

मतदार जागृती अभियानाचे प्रशासनाला निवेदन : हरकतींवर कार्यवाही थांबविण्याचे आवाहन 

नगर: मतदान हा लोकशाहीने मतदाराला दिलेला वैयक्तिक अधिकार आहे. यावर कोणाचा मालकी हक्क नाही. असे असताना प्रभाग रचनेत आणि मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाला आहे. वैयक्तिक मतदारापेक्षा राजकीय पक्षांनी त्यावर हरकती घेतल्या आहेत. प्रशासनाने देखील या घाऊक हरकतींवर कार्यवाहीचा घाट घातला आहे. हे लोकशाहीला मारक असून, ते थांबवावे असे आवाहन मतदार जागृती अभियानाचे निमंत्रक तथा आरटीआय कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले, अशोक सब्बन व अर्शद शेख यांनी केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देण्यात आले आहे.

-Ads-

महापालिकेची निवडणूक नऊ डिसेंबरला होत आहे. प्रभाग रचनेपासून ते मतदार यांद्यापर्यंत आणि मतदानापर्यंत सर्वच पातळीवर प्रशासनाची धावपळ उडाली आहे. यात मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाला आहे. याद्यांमधील नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. याबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. राजकीय पक्ष त्यांच्या विरोधी राजकीय पक्षातील कार्यकर्ते, नेते यांनी हा प्रकार केल्याचे आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.

वास्तविक पाहता हरकत घेणाऱ्या व्यक्तीने 300, 800 व 900 मतदारांबाबत घाऊक हरकती घेतलेले आहेत. याबाबत संबधितांना याची माहिती आहे का, याचीही शहानिशा व्हायला हवी. एखाद्या मतदाराबाबत नेता, कार्यकर्ता हरकत घेतो आणि प्रशासन त्या हरकतीची दाखल घेवून कार्यवाही सुरू करते हे चुकीचे आहे. कमीतकमी त्या मतदाराला नागरिकाला किंवा कुटुंबियांना त्याची माहिती व्हावी. मतदाराला त्याच्या नाव स्थलांतराविषयी घेतलेल्या हरकतीची विचारणा व्हावी. जो मतदार अनेक वर्षापासून जिथे राहतो तेथेच त्याला मतदानाचा हक्क त्याच्या मर्जीनुसार द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

राजकीय कार्यकर्ते, नेते यांनी हरकत घेतलेली असल्याने सर्वसामान्य नागरिकाला कळल्यावर काहीच बोलू शकत नाही व विरोधही करू शकत नाही, ही बाब लोकशाहीच्या दृष्टिने गंभीर आहे. सामान्य मतदारांच्या हक्काचे निर्णय परस्परपद्धतीने व घाऊक पद्धतीने घेण्याचे काम सर्रास चालू आहे. ही कृती लोकशाहीला मारक आहे. प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे ही निवडणूक दहशतीत होते की काय अशी भीती वाटू लागली आहे. लोकशाही प्रबळ होण्यासाठी घाऊक हरकती घेणे बंद करावेत. राजकीय दहशत थांबविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर या प्रकाराची गंभीर दखल कार्यवाही करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

प्रशासनाने मतदार याद्यांबाबत जागृती करायला हवी. प्रभागाच्या हद्दी, त्यामध्ये अंतर्भूत असलेले भाग याची माहिती मतदारांना करून देणे गरजेचे होते. शहरातील अनेक सामाजिक संस्था, संघटना प्रशासनाच्या मदतीला येऊ शकतात. प्रशासनाने मूळ मतदार याद्या अद्यावत करावेत. 

– विठ्ठल बुलबुले, आरटीआय कार्यकर्ता 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)