महापालिका रणसंग्राम २०१८: ठाकरेंसह शिवसेनेचे 20 स्टार प्रचारक

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना वगळले 

नगर: महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी गुरुवारी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे स्टार प्रचारकांची यादी देण्यात आली असून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह तब्बल 20 जणांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीतून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना मात्र वगळण्यात आले आहे.

राज्यसभेचे सदस्य तथा शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे शिवसेनेचा प्रचारसभा घेणार आहेत. त्या प्रचार सभाचे नियोजन देखील शिवसेनेकडून करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने खुल्या प्रचाराला सुरूवात होते.

महापालिकेच्या 68 जागांसाठी 9 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी प्रचार थांबणार आहे. त्या दरम्यान शिवसेनेच्या तब्बल 20 प्रचारकांच्या सभा शहरात होणार आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या दोन सभा घेण्याचे नियोजन आहे. एक सभा शहराच्या मध्यवर्ती तर दुसरी सभा सावेडी किंवा केडगावमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शिवसेनेचे जाहीर केलेली स्टार प्रचारकांची यादी पुढीलप्रमाणे रामदास कदम, संजय राऊत, गजाजन किर्तीकर, आनंदराव आडसूळ, एकनाथ शिंदे, संजय राठोड, दादा भुसे, विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, अनिल देसाई, आदेश बांदेकर, अरविंद सावंत, रवींद्र मिर्लेकर, विश्‍वनाथ नेरूरकर, निलम गोऱ्हे, नितीन बानगुडे पाटील, भाऊ कोरगावकर, शिवरत्न शेटे यांचा समावेश आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महिन्यापूर्वी कार्यकर्ता मेळावा नगर शहरात झाला आहे. त्यावेळी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा तिन्ही ठिकाणी शिवसेनेचाच झेंडा फडकणार अशी घोषणा केली होती. त्याची सुरवात महापालिका निवडणुकीपासून सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी चांगली फौज नगरला पाठविणार आहेत. मंत्री, शिवसेनेचे नेते, प्रवक्ते हे नगरचे मैदान गाजविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
40 :thumbsup:
2 :heart:
2 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)