महापालिका रणसंग्राम २०१८: युतीसाठी कार्यकर्ते आग्रही पण नेत्यांचा विरोध

 खा. गांधी, राठोड यांच्यातील वाद ठरतोयं युतीला अडसर

नगर: महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा देण्यात आला असता तरी शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांना मात्र युती हवी आहे. आज अनेक प्रभागात दोन्ही पक्षांचे मंडळ लगडे झाले आहे. अशावेळी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना एकमेकांची आवश्‍यक आहे. तसेच मतविभागणी टाळण्यासाठी युती करावी असा आग्रह शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांचा आहे. परंतू युतीला स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी व शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यातील वाद युतीसाठी अडथळा ठरू लागला आहे. दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी युती अनकुल असतांना एकमेकांच्या जिरवाजिरवीचे राजकारण खा.गांधी व राठोड करीत असल्याने त्यांचा फटका दोन्ही पक्षांना बसत आहे. अशी भावना आता कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत.

महापालिका निवडणूक जाहीर होण्याअधिपासून खा. गांधी व राठोड दोघेही स्बळाचा नारा देत आले आहेत. त्यातून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील केले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून एकमेकांवर दोन्ही नेत्यांनी जोरदार चिखलफेक करून चांगलेच वाभाडे काढले. माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या वृक्‍तव्याचा शिवसेनेने चांगलाच समाचार घेवून खा. गांधी यांची कोंडी करण्याची एकही संधी राठोड यांनी सोडली नाही. तर महापालिकेच्या कारभार खा. गांधी त्यांनी जोरदार आरोप करून शिवसेनेला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खा. गांधी व राठोड यांच्यात मोठी दरी पडली असून त्यातून दोन्ही नेत्यांकडून युतीला फारकत घेण्यात आली. परंतू महापालिकेत एकहाती हाती सत्ता आणणे शिवसेनेबरोबर भाजपला शक्‍य नाही. दोन्ही पक्षांकडून 40 प्लस जागा येण्याचा दावा करण्यात आला आहे. परंतू बहुसदस्य प्रभाग रचनेत दोन्ही पक्षांकडे उमेदवारांचा वाणवा आहे. काही प्रभागात दोन्ही पक्षांकडे प्रभावी उमेदवार नाही तर काही प्रभागात एक ते दोनच प्रभावी उमेदवार आहेत. त्यामुळे प्रभागात दोन्ही पक्षांचे मंडळ पूर्ण होईना, अशी अवस्था आहे.

मतविभागणी टाळण्यासाठी युती होणे गरजेचे असल्याचे मत शिवसेना व भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केले आहे. त्यासंदर्भात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर बोलून दाखविले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून खा. गांधी व राठोड यांच्यात वाद सुरू झाला आहे. तो वाद कार्यकर्त्यांमध्ये देखील सुरू झाला आहे. परंतू आता महापालिका निवडणूक लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी या वादावर पडदा टाकला असून युती करावी असा आग्रह धरला आहे. शिवसेनेतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी आता जाहीरपणे युतीशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्‍त केले आहे.

भाजपमधील एक गट युतीसाठी अनकुल आहे. या गटाने खा. गांधी यांच्या भूमिकेला विरोध करून पक्षश्रेष्ठींकडे युतीचा आग्रह धरला आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील युतीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. या निवडणूकीसाठी भाजपने स्थापन केलेल्या कोअर समितीमधील खा. गांधी वगळता अन्य सदस्यांनी देखील युतीसाठी प्रतिसाद दिली आहे. या कोअर कमिटीचे प्रमुख पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी युतीचा प्रयत्न सुरू केला आहे. महापालिकेत सत्ता येण्यासाठी युतीशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्‍त करण्यात आले आहे. आता याबाबत खा. गांधी व राठोड हे काय भूमिका घेणार हे महत्वाचे आहे. अर्थात राठोड यांनी दोन दिवसांपूर्वी युतीला खा. गांधी याचा विरोध आहे. आपण युतीसाठी अनकुल असल्याचे स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)