महापालिका मुख्यालयासमोरील मोकळ्या जागेची मागणी

पिंपरी – बस उभ्या करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरील मोकळी जागा डेपो व बस स्थानकासाठी देण्याची मागणी पीएमपीएमएलने केली आहे. ही जागा पीएमपीएमएलने 30 वर्षे कालावधीसाठी मागितली आहे.

पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे 2 हजार 100 बस आहेत. तसेच, ताफ्यामध्ये नव्याने आणखी 900 बस दाखल होणार आहेत. या सर्व बस पार्कींगसाठी पीएमपीएमएलकडील जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे शेकडो बसचे पार्कींग रस्त्यावर केल्या जात आहेत. त्यामुळे बसचे वेगवेगळ्या पद्धतीने चोरी व नुकसान होऊन आर्थिक भार वाढत आहे. सार्वजनिक सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून सर्व बसचे पार्कींग संरक्षित जागेवर होणे आवश्‍यक आहे. या बससाठी जागेची आवश्‍यकता आहे.

त्यासाठी पीएमपीएमएलने पालिकेकडे अनेक जागांची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरील आरक्षण क्रमांक 116 येथील 7 हजार 300 चौरस मीटर जागा बस डेपोसाठी आरक्षित आहे. त्या जागेचा वापर पीएमपीएमएल बस पार्कींग डेपो किंवा बस स्थानकासाठी करणार आहे. सदर जागा 30 वर्षे कालवधीसाठी पीएमपीएमएलने मागितली आहे. जागा वापरासाठी कायदा, नगर रचना विभागाच्या अभिप्राय, अटी व शर्तीस अधीन राहून पीएमपीएमएलला जागा देण्याचा प्रस्ताव येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.
पालिका सर्वसाधारण सभेने त्यास मंजुरी दिल्यास सदर बस डेपो व स्थानक बांधून देण्याचा खर्चही पालिकेस करावा लागणार आहे. त्यासाठी स्थायी समितीची मान्यता घेण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)