महापालिका प्रशासनाने “खेळ मांडला’

“क्रीडा’ समितीची बैठक : जलतरण तलाव ठेकेदारांना “अभय’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात एकूण 12 जलतरण तलाव उभारण्यात आले आहे. मात्र, संबंधित तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पाच महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदारांच्या कामाची मुदत संपली आहे. मात्र, तरीही प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती संजय नेवाळे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत.

महापालिकेतील नवनिर्वाचित क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती पहिली बैठक शुक्रवारी झाली. यावेळी समिती सदस्य सुजाता पालांडे, अनुराधा गोफणे, अपर्णा डोके यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
दैनिक “प्रभात’च्या वतीने शहरातील जलतरण तलावांवरील असुविधांबाबत “तलावायन’ ही विशेष मालिका सुरू केली होती. त्याची सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्याचे पडसाद बैठकीत उमटले. जलतरण तलावांच्या देखभाल दुरुस्तीबाबत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा सभापती नेवाळे यांनी दिला आहे.

सभापती नेवाळे म्हणाले की, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित महापालिका प्रशासन अनेक उपक्रम राबवत असते. मात्र, त्याबाबत समिती सदस्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. समितीशी संबंधित कोणताही कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सदस्यांना सांगून कार्यवाही सुरू करावी. तसेच, 2012 पासून सुमारे 150 खेळाडुंना प्रशासनाने दत्तक घेतले आहे. त्या खेळाडुंची माहिती आणि त्या खेळाडुंनी कोणती कामगिरी केली, याची माहिती प्रशासनाकडे मागवली आहे.

शहरात महापालिकेच्या ताब्यात एकूण 15 मैदाने आहेत. मात्र, त्याचा वापर योग्य रितीने होत नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ खेळाडूंना अशा मैदानांवर ऍकॅडमी सुरू करण्याबाबत धोरण तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे नवोदित खेळाडुंना चांगले प्रशिक्षण उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्याबाबत पाठपुरावा करणार आहे.
– सुजाता पालांडे, सदस्या, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)