महापालिका देणार क्रीडा साहित्यासाठी अनुदान

पुणे  : शहरातील उद्योन्मुख खेळांडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून आता खेळाडूंना क्रीडा साहित्यासाठी 50 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठीचा निर्णय क्रीडा समितीने घेतला असून पुढील बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात येणार असल्याचे क्रीडा समितीचे अध्यक्ष राहूल भंडारे यांनी सांगितले. या योजनेसाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात सुमारे 60 लाख रूपयांची तरतूद असून महापालिकेकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे अनुदान दिले जाणार असल्याचे भंडारे यांनी स्पष्ट केले.महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या क्रीडा धोरणात सुधारणा करण्यात येत असून या सुधारणा अंतर्गत ही तरतूद प्रस्तावित करण्यात आली असल्याचे भंडारे यांनी स्पष्ट केले.
महापालिकेकडून शहरातील उद्योन्मुख खेळांडूना प्रोत्साहन मिळावे तसेच आंतराराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी पालिकेकडून महापौर चषक क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांसह खेळाडूंना सरावासाठी तसेच क्रीडास्पर्धांची तयारी करण्यासाठी प्रत्येकी 50 हजार हजार रूपयांचे शिष्यवृत्ती देण्यासाठी 2018-19च्या अंदाजत्रकात सुमारे 60 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे अनुदान देताना ते खेळाडूंना साहित्याच्या स्वरूपात देण्याबाबत समितीने निर्णय घेतला आहे. या शिवाय, या उपक्रमासाठी सर्व क्रीडा स्पर्धांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नसल्याचे भंडारे म्हणाले, दरम्यान, महापालिकेकडून या उपक्रमा अंतर्गत इंडीयम ऑलिंपिक असोसिएशनचे मेडल असलेल्या खेळाडूंनाही या उपक्रमाचा लाभ देण्यात येणार असल्याचे क्रीडा विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)