महापालिका काढणार खडकवासला धरणातील गाळ

प्रस्तावास शहर सुधारणा समितीची मान्यता

पुणे : खडकवासला धरणातील पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी महापालिकेने अंदाजपत्रकात कायदेशीर मान्यता घेऊन तरतूद करण्यास शहर सुधारणा समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नगरसेवक हरीदास चरवड यांनी याबाबतचे पत्र दिले होते. तसेच या कामासाठी धरणात आसपासच्या गावांमधून येणारे सांडपाणी रोखण्यासाठी राज्यशासन व महापालिकेने संयुक्त प्रकल्प राबवावे असा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शहर व जिल्हात मोठया प्रमाणात पाणी टंचाई आहे. त्यातच वाढती लोकसंख्या, पाण्याचा अपव्यय यामुळे धरणातील पाणी शहरातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनासही कमी पडत असून त्यामुळे ग्रामिण व शहरी असा वाद निर्माण होत आहे. त्याच धरणात मोठया प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची साठवण क्षमता कमी झाल्याने पावसाळयात जादा पाणी झाल्यास ते सोडावे लागते तर पाणीसाठा कमी झाल्यास कपात करावी लागते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे धरणाची साठवण क्षमता वाढविणे आवश्‍यक असून त्यासाठी धरणातील गाळ काढणे योग्य होणार आहे.ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने यासाठी कायदेशीर मान्यता घेऊन गाळ काढावा असे पत्र चरवड यांनी दिले. त्यास शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)