महापालिका आयुक्‍त शिवसेनेच्या “रडार’वर

निष्क्रीयतेचा आरोप : अतिक्रमण कारवाईवरुन संघर्ष पेटला

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आयुक्‍त श्रावण हर्डीकर म्हणजे सत्ताधारी भाजपचे दलाल आहेत. आतापर्यंतच्या आयुक्‍तांमध्ये सर्वात निष्क्रीय आयुक्‍त म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे, अशी टीका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी भोसरीत मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण कारवाई करण्यात आली. अनधिकृत शेड, पत्राशेड हटवण्यात आल्या. मात्र, संबंधितांना दिलेल्या नोटीसांसोबत शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या तक्रारीचे प्रत्र प्रशासनाने जोडले आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांना बदनाम करण्यासाठीच प्रशासनाने त्यांच्या तक्रारीचे पत्र नोटिसीसोबत जोडले, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. याबाबत आयुक्‍तांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे, असेही म्हटले आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने जुन्या व्यावसायिकांना नोटिसा दिल्या आहेत. त्यांच्या नोटिशीसबरोबर खासदार आढळराव पाटील यांच्या पत्रांची झेरॉक्‍स जोडून वाटण्यात आली. राजकीय गुंड आणि प्रशासकीय अधिकारी खासदार आढळराव पाटील यांच्या बदनामीचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

चोर सोडून सन्याशाला फाशी
गेल्या 20-25 वर्षांपासून व्यावसाय करणाऱ्या व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे अपेक्षित असताना महापालिका आयुक्‍त चोर सोडून सन्याशाला फाशी देत आहेत. नव्या पत्राशेडजवळ स्थानिक गुंड उभे राहून माता-भगिनींची छेडछाड काढतात. तसेच, नव्याने पत्राशेड उभारून रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या पत्राशेडवर कारवाईसाठी खासदार आढळराव पाटील यांनी पत्र दिले होते. मात्र, आयुक्‍तांकडून जुन्या व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या. त्यांच्या नोटिसीबरोब खासदार आढळराव पाटील यांच्या पत्राची झेरॉक्‍स जोडण्यात आली, अशी टीका शिवसेनेच्या शहर संघटिका सुलभा उबाळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)