महापालिका अभियंत्याशी हुज्जत पडली महागात

पिंपरी – रस्ता विकसनाचे काम सुरू असताना महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता सोबत हुज्जत घालून रस्त्याचे काम बंद पाडले. यावरून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 29) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता विजय चंद्रकांत कांबळे (वय-45) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रभावती सुदाम जाधव (वय-63), शिला अशोक आंबेकर (वय-65), मीना पांडुरंग दळवी (वय-45), अंजुम रशीद शेख (वय-40), पांडुरंग बाबुराव दळवी (वय-53), अभय अशोक आंबेकर (वय-28), अक्षय पांडुरंग दळवी (वय-23, सर्व रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथे पगारे रुग्णालयासमोर सार्वजनिक रस्त्याचे काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आरोपी कामाच्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हुज्जत घातली आणि रस्त्याचे काम बंद पाडले. त्याबाबत फिर्यादी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत असताना आरोपींनी तुम्ही कसे काम करता तेच बघतो अशी धमकी दिली. यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)