महापालिका अभियंत्याचा डेंग्यूने मृत्यू

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड (वय 57) यांचा डेंग्यूची लागण झाल्याने उपचारादरम्यान पुण्यातील एका खासगी रुग्णलायात बुधवारी (दि. 3) मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी निगडी परिसरातील एका नगरसेवकाला देखील डेंग्यूची लागण झाल्याने उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या घटनांमुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग पूर्णत: निष्प्रभ ठरला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांची तब्येत खालावल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या सेवानिवृत्तीला एक वर्षाचा कालावधी शिल्लक होता. याशिवाय निगडी परिसरातील एका नगरसेवकाला देखील डेंग्यूची लागण झाल्याची बाब निष्पन्न झाली आहे.

याबाबत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी या घटनांना सत्ताधारी भाजपसह प्रशासनाला जबाबदार धरले आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाच्या नियुक्तीवरून डॉ. अनिल रॉय आणि डॉ. पवन साळवे यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या भांडणाचा वैद्यकीय विभागाला फटका बसत आहे. वायसीएमसह शहरातील महापालिका रुग्णालये, कासगी रुग्णालये व दवाखाने तापाच्या रुग्णांनी फुल्ल झाली आहेत.

महापालिका रुग्णालयांमध्ये डेंग्यू व स्वाईन फ्ल्यूवरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी कोंडी होत आहे. यामध्ये महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्तिश: लक्ष घालून, ही समस्या सोडवावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, स्थायी समितीच्या आज (बुधवारी) झालेल्या सभेत जीवन जाधव यांना श्रध्दांजली अर्पण करत सभा तहकूब करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)