महापालिकांसाठी दिल्ली सरकारची 6903 कोटींची तरतूद

दिल्ली सरकारच्या अर्थसंकल्पातील महत्वाचा निर्णय
नवी दिल्ली – दिल्लीतील तिन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत परंतु त्यांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याची बाब ध्यानात घेऊन दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने या महापालिकांसाठी तब्बल 9.88 टक्‍क्‍यांची वाढीव तरतूद करताना महापालिकांना एकूण 6903 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारचे सन 2018-19 सालचा अर्थसंकल्प राज्य सरकारने सादर केला असून त्यात ही तरतूद करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी नमूद केले की या महापालिकांना मागील काही काळातही आम्ही आर्थिक सहकार्य केले आहे. त्याचे व्याज आणि हप्तेही या महापालिकांनी थकवले आहेत. तरीही आम्ही त्यांना यंदा वाढीव मदत देऊ केली आहे. दिल्ली सरकारचे हे एकूण अंदाजपत्रक 53 हजार कोटी रूपयांचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)