महान नेत्यांची जयंती वाचून साजरी करा -शितलदेवी मोहिते पाटील

अकलूज- देशातील महान राष्ट्रीय नेत्यांची जयंती नाचून साजरी न करता वाचून साजरी करा आणि आपले भविष्य उज्ज्वल करा,असा संदेश शिवरत्न शिक्षण संस्थेच्या चेअरमन आणि सोलापूर जि. प. सदस्या शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी दिला.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉटर्स मॉम फाऊंडेशन आणि लहुजी शक्ती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुंटुबातील 41 मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी 5 हजार रुपयांची पावती (एफ. डी.) प्रमाणे दोन लाख पाच हजार रुपयाच्या पावतीचे वाटप आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी डॉटर्स मॉम फाऊंडेशन अध्यक्षा शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, महाराष्ट्र बॅंकेचे मॅनेजर श्रीयश खाडे, डॉटर्स मॉम फाऊंडेशन सदस्या, ग्रामपंचायत सदस्या आदी मान्यवरांच्या हस्ते पावती वाटप कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डॉटर्स मॉम फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या की, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्यात लोकवाङ्‌मय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कांदबऱ्यांनी सशक्त केले.
अण्णा भाऊ साठे यांनी लावण्या, गीत, पद या काव्य प्रकाराचा सामान्य कष्टकरी जनतेत विचाराच्या प्रचारासाठी वापर केला. अशा साहित्य सम्राटाची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा, असा संदेश त्यांनी दिला. डॉटर्स मॉम फाउंडेशन गेली 6 वर्षे स्त्री सक्षमीकरणासाठी उपक्रम राबवत आहे. भविष्यात देखील सर्व मुलींच्या पाठीशी आम्ही राहू, असेही त्या म्हणाल्या आणि शिक्षणासाठी 5 हजार रुपयांच्या पावतीचा उपयोग हा शिक्षणासाठीच करा,अन्य कोणत्याही कारणासाठी करू नका, असा सल्ला देखील त्यांनी लाभार्थींना दिला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)