महादेव जाणकर राजकारणाचे सुपर मॅग्नेट : विष्णू चव्हाण

सरडे ः रासप शाखा उद्घाटनप्रसंगी विष्णू चव्हाण, भाऊसाहेब वाघ, कल्पना गिट्टे, सविताताई पाटील आदी मान्यवर.

दुधेबावी, दि. 24 (प्रतिनिधी) – महादेव जानकर हे भविष्यातील राजकारणाचे सुपर मॅग्नेट आहेत, असे मत रासप नेते विष्णू आप्पा चव्हाण यांनी व्यक्त केले. फलटण तालुक्‍यातील सरडे येथे रासप शाखा उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, जानकरांच्या प्रत्येक कृतीतुन साधेपणाची झलक दिसते. सामान्यांना व उपेक्षितांना, गोरगरिबांना स्वप्न दाखवणारा नव्हे तर त्यांची स्वप्ने सत्यात आणण्यासाठी उत्तेजन देणारा अवलिया, गल्लीतच नव्हे तर दिल्लीतच प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारा आणि मंत्री असूनही आजही बॅनर, झेंडे, बांधणारा, सभेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखे सभेत बसणारा माझा नेता, प्रगतीचा आलेख सतत उंचावणारे नेते असल्यामुळे सर्व सामान्य लोकांना आपलेसे वाटतात.
यावेळी राज्यकार्यकरिणी सदस्य भाऊसाहेब वाघ, प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी कल्पना गिट्टे, पश्‍चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष सविताताई पाटील, बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी बापूराव सोलनकर, सातारा जिल्हा अध्यक्ष मामुशेठ वीरकर, जेष्ठ नेते खंडेराव सरक, सातारा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पूजाताई घाडगे, खटावच्या अध्यक्षा शुभांगी फडतरे, फलटण तालुका अध्यक्षा सुवर्णाताई नाळे, माढा लोकसभा उपाध्यक्ष, संतोष ठोंबरे, फलटण तालुका अध्यक्ष प्रा. संतोष सोनवलकर, युवक अध्यक्ष नीलेश लांडगे, डॉ. दादासो भिसे, काकासाहेब बुरुंगले, तुकाराम गावडे, प्रताप जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष प्रा. संतोष सोनवलकर तर आभार सरडेगांवचे सरपंच दत्ताजी भोसले यांनी मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)