महादेवनगरात ठेकेदाराचा गलथानपणा

 रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली विज व पाणी पुरवठा केला बंद


नागिरकांना करावा लागतोय विविध समस्यांचा सामना


ग्रामपंचायत सदस्य आण्णा धारवाडकर यांचा आंदोलनाचा इशारा

मांजरी – रस्ता रुंदीकरण करताना ठेकेदाराने तोडलेली वीज व पाणी पुरवठा सुरळीत करून द्यावा. अन्यथा मांजरी बुद्रुक रस्त्याचे काम बंद पाडले जाईल, असा इशारा मांजरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्यमान सदस्य आण्णा धारवाडकर यांनी दिला आहे.

मांजरी बुद्रुक रस्ता रुंदीकरण काम महादेवनगर येथे सुरू आहे. काम करताना ठेकेदाराने आधी पाण्याची लाईन आणि विजेचे जोड देणे आवश्‍यक असताना शेकडो नळजोड तोडून ठेवले आहेत. याशिवाय वीज पुरवठा खंडित केला आहे. तसेच कॉलनी मध्ये ये-जा करण्यासाठी असलेला रस्ताही तोडून ठेवला आहे, त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेली अनेक दिवसांपासून नागरिकांना पिण्यासाठी आणि वापरासाठी पाणी नाही. रस्ता तोडल्याने टॅंकरने पाणी आता नेता येत नाही. वीज जोड तोडून ठेवले आहेत. तेव्हा संबंधित ठेकेदाराने नागरिकांचे नळजोड जोडून द्यावेत, याशिवाय वीज मीटरपर्यंत वीज जोड करून द्यावेत, अशी मागणी आण्णा धारवाडकर यांनी केली आहे.

मांजरी बुद्रुक रस्ता रुंदीकरण आणि सिमेंट कॉंक्रीटीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या महादेवनगरच्या टप्यात काम सुरू आहे. येथे कामात अडथळा निर्माण होणाऱ्या अनेक रहिवाशांना नोटीस बजावली आहे. मात्र, काहींना हेतुपुरस्सर नोटीस बजावल्याची तर काहींना बगल दिल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याप्रकरणी रस्ता विकासाच्या नावाखाली कोणावरही अन्याय होऊ नये. रस्ता आणि फुटपाथ नियमांनुसार करावेत. कमी अधिक रुंदीकरण आणि फुटपाथ करून दुजाभाव करत कारवाई होऊ नये, अशी मागणी धारवाडकर यांनी केली आहे. दरम्यान याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

रुंदीकरण कामात दुजाभाव
मांजरी बुद्रुक रस्त्याचे मार्किंगनुसार रुंदीकरण होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जात असले तरी, महादेवनगर येथील प्रत्यक्ष काम त्याला अपवाद ठरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रुंदीकरणानंतरची रस्तारेषा कमी अधिक करून रस्ता रुंदीकरण कामात दुजाभाव केला आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)