महात्मा बसवेश्‍वर पुस्तकाचे प्रकाशन

अकलूज- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने “सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा बसवेश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा बसवेश्वर यांच्या सामाजिक कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी, यासाठी वीरशैव लिंगायत समाज, अकलूजचे अध्यक्ष रत्नाकर सरताळे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, शामा पवार, वीरशैव लिंगायत समाज अकलूजचे अध्यक्ष रत्नाकर सरताळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत कुंभार, उपाध्यक्ष विलास क्षीरसागर, सचिव सुहास उरवणे आदी उपस्थित होते. हे पुस्तक माळशिरस तालुक्‍यातील ग्रंथालय उपलब्ध असणाऱ्या सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वाटले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)