महात्मा फुले वाड्याला चंद्रशेखर आझाद यांची भेट

पुणे – भीम आर्मी संघटनेचे चंद्रशेखर आझाद यांनी येथील महात्मा फुले वाड्यात जाऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन केले आहे. “मी जिथं जातो, त्या राज्यातून भाजपचे सरकार जाते’ असा टोला लगावून चंद्रशेखर यांनी राज्य सरकारने केलेल्या नजर कैदीचा आणि समाचार घेतला. यानंतर चंद्रशेखर यांनी लाल महालालाही भेट दिली आहे.

आझाद म्हणाले, “मी उद्या भीमा कोरेगावला जाणार असून मला तिथे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.’ दरम्यान, त्यांना उच्च न्यायालयाने तशी परवानगीही दिली. नजरकैदेत ठेवण्याच्या सरकारच्या कृतीवर त्यांनी “संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे खुलेआम फिरत असू मला मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जातो,’ असे वक्तव्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
14 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)